VicksWeb upgrade Location upload ads trending
VicksWeb भारत

वर आपले स्वागत आहे VicksWeb

Flag Counter
आंध्रप्रदेशात सीबीआयला नो एन्ट्री, चंद्राबाबू सरकारचा निर्णय
Source:  Maharashtra Times
Friday, 16 November 2018 21:02


पुण्यात १ जानेवारीपासून पुन्हा हेल्मेटसक्ती होणार
Source:  Maharashtra Times
Friday, 16 November 2018 20:40


शबरीमलाः तृप्ती देसाई विमानतळावरूनच माघारी
Source:  Maharashtra Times
Friday, 16 November 2018 19:36


ब्रॅडमन आणि पुलं भेटीचा आनंद सारखाच: सचिन
Source:  Maharashtra Times
Friday, 16 November 2018 19:20


मला धक्के मारून ऑफिसमधून हाकललं: गोविंदा
Source:  Maharashtra Times
Friday, 16 November 2018 19:09


शिर्डीः साई संस्थान मंदिराच्या प्रमुखाविरुद्ध गुन्हा
Source:  Maharashtra Times
Friday, 16 November 2018 19:01


‘तृप्ती देसाई गो बॅक’, शबरिमला कर्मा समितीची निदर्शने !
Source:  PRAHAAR
Friday, 16 November 2018 18:59

प्रहार वेब टीम

मुंबई : ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासाठी सरसावल्या आहेत. काही महिला कार्यकर्त्यांसह त्या शुक्रवारी सकाळी पुण्याहून केरळमध्ये दाखल झाल्या. पण त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले. तृप्ती यांनी मंदिरात प्रवेश करू नये यासाठी ‘शबरिमला कर्मा समिती’कडून सायंकाळी निदर्शने करण्यात येत आहे. ‘तृप्ती देसाई परत जा’ असे लिहीलेल्या पाट्या हातात घेऊन समितीच्या महिला तृप्ती यांच्या मंदिरातील प्रवेशाला विरोध करत आहेत.

शबरिमला मंदिरातील महिलांची प्रवेशबंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली. असे असतानाही हिंदुत्ववाद्यांकडून शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास विरोध होत आहे. १७ नोव्हेंबर रोजी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. महिलांना प्रवेशासाठी होणारा विरोध मोडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न तृप्ती करणार आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्या येणार असल्याचे समजताच आंदोलक मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसरात जमले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. केरळ सरकारकडून कोणतेही संरक्षण मिळाले नाही, तरी आम्ही पुढे जाणार आणि दर्शन घेणार असा निर्धार तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला आहे.


कराड अर्बन बँकेकडे दिवाळी पाडव्यानिमित्त 3 कोटीपेक्षा अधिक ठेवी
Source:  Lokmanthan
Friday, 16 November 2018 18:59


कराड (प्रतिनिधी) : कराड अर्बन बँकेच्या ग्राहक, खातेदार व सभासदांनी दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधून बँकेच्या सर्व शाखांमध्ये रू. 18.50 कोटींच्या ठेवी नव्याने जमा केल्या, यापैकी कराड शहरातील शाखांमध्ये ठेवीदारांनी रू. 3 कोटींपेक्षा अधिक ठेवी जमा करून बँकेवरील विश्वास दृढ केला आहे. 

बँकेने ग्राहकांना आजवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तत्पर सेवा दिली आहे. दीपावली सणाच्या काळात बँकेची सर्व ए.टी.एम. सलग चोवीस तास सुरू होती. त्यामधून सणाच्या सात दिवसात जास्तीत जास्त उंब्रज, पुसेगाव, मसूर, सातारा व वडूज या पाच शाखांतील ए.टी.एम. मधून तीन हजारपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. तसेच एका दिवशी वडूज, ङ्गलटण, सातारा शहर, पुसेगाव, उंब्रज, रहिमतपूर या शाखांमधून पाचशे पेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. 

सणाच्या सात दिवसात बँकेच्या सर्व ए. टी. एम. मधून एकूण 67 हजाराहून अधिक ग्राहकांनी सणाच्या काळात बँकेच्या ए.टी.एम. सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये अन्य बँकांच्या 55 हजार 500 ग्राहकांना आपल्या बँकेच्या एटीएम. मधून रक्कम रू. 15 कोटी 68 लाख इतकी रक्कम कराड अर्बन बँकेमार्ङ्गत वितरीत करण्यात आली. आपल्या बँकेच्या एटीएममध्ये तत्काळ कॅश भरणा करण्याची यंत्रणा बँकेने उभारली असल्याने ग्राहकांना अविरतपणे कॅश उपलब्ध होत असते. त्यामुळे बँकेच्या उत्तम, तत्पर आणि सुरक्षित ए.टी.एम. सेवेचा लाभ घेण्याकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येतो हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पर्याप्त वापर आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी दिली. 
बँकेचे कुटुंबप्रमुख व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बँक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. कराड अर्बन बँकेला शंभर वर्षाची वैभवशाली अशी विश्वासार्ह परंपरा आहे. त्यामुळे ग्राहक, खातेदार व सभासदांशी बँकेशी असलेले नाते अधिकच दृढ आहे. बँकेने सातत्याने ग्राहकाभिमुख सेवेला प्राधान्य दिले असून ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा दिली जात आहे.


पर्यटनाला जाताय? मग या ठिकाणी नक्की जा!
Source:  Maharashtra Times
Friday, 16 November 2018 18:46

हिवाळा सुरू झाल्याने जर पर्यटनाला जाण्याचा प्रयत्न करत असाल तर भारतातील या काही महत्त्वाच्या ठिकाणी नक्की जा! थंड हवेच्या अनेक ठिकाणी हिमवृष्टी होत असल्याने सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळी स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. अशाच काही ठिकाणांचा घेतलेला हा मागोवा.

VIDEO नितेश राणे यांनी IAS अधिका-याला खडसावले
Source:  PRAHAAR
Friday, 16 November 2018 18:46

प्रहार वेब टीम

सासवड : मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती देणा-या तरुणाच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर केली होती. मात्र तीन महिने उलटून गेल्यानंतरही संबंधितांस ही मदत पोहोचली नसल्याचे समजताच आमदार नितेश राणे यांनी पुणे जिल्हाधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. दोन दिवसात ठोस कारवाई करा, अन्यथा विधिमंडळात आवाज उठवू, असा इशाराही राणे यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे सासवड येथील दत्तात्रय शिंदे यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत शासनाने जाहीर केली. परंतु ती अद्याप मिळाली नाही. ही बाब १५ नोव्हेंबरला पुरंदर सासवडच्या मराठा ठिय्या आंदोलकांच्या भेटीला आलेल्या आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास कार्यकर्त्यांनी आणली.

आंदोलकांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांसोबत दुपारचे जेवण करत असतानाच आमदार नितेश राणे यांनी थेट पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना फोन लावला. शिंदे यांच्या कुटुंबियांना अजून मदत का मिळाली नाही, याची विचारणा त्यांनी केली. लवकरात लवकर मदत द्या, तुमच्या शब्दाला वर किंमत नसेल तर पदावर राहून काय उपयोग, असा सवाल आ. राणे यांनी केला.


<< < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > >>