VicksWeb upgrade Location upload ads trending
VicksWeb भारत

वर आपले स्वागत आहे VicksWeb

Flag Counter
स्वतंत्र लढलो तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार - रावसाहेब दानवे
Source:  Lokmanthan
Thursday, 17 January 2019 19:13


आमचा आणि मित्रपक्षाचा उद्देश एकच नरेंद्र मोदीच पंतप्रधान

कराड (प्रतिनिधी) - भाजप - शिवसेना युती नाही झाली तरी जेव्हा पंतप्रधान म्हणून राहूल गांधी का नरेंद्र मोदी असा सवाल जनतेसमोर येईल. तेव्हा भाजपने स्वतंत्र निवडणूक लढली तर पूर्वीपेक्षा जादा जागा जिंकणार, हे निश्‍चित असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. गोटे (ता. कराड) येथील महिंद्रा हाँटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

या वेळी पक्षाच्या प्रभारी नीता केळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत पाटील, मनोज घोरपडे, एकनाथ बांगडी, डाँ. दिलीप येळगांवकर, अनिल देसाई यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, भाजप विकासकामाच्या जोरावर निवडणुक लढवणार आहे. मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील. जेथे आमचे काम वाढले असेल तेथे आमचा उमेदवार असेल. शिवसेना - भाजप एकत्र लढावे, मतविभाजन होवू नये यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न राहील. मात्र तरीही जे येतील त्यांच्यासह, जे नसतील त्यांच्याशिवाय भाजप निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे 48 मतदारसंघात आमची तयारी चालू आहे. जेथे आमचे काम चांगले होईल आणि तेथे युतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा मित्रपक्षालाही होईल. शेवटी त्यांचा आणि आमचा उद्देश एकच आहे, या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत. शिवस्मारकांच्या प्रश्‍न काही तांत्रिक गोष्टीमुळे वेळ लागत आहे. अशोक चव्हाण यांना पुढचे दहा वर्षे टीका करण्यांचे काम आहे. भाजप-शिवसेना अपवादात्मक वगळता गेल्या 30-35 वर्षापासून एकत्र आहे. ही युती इथून पुढे हि अशीच राहील असा आमचा प्रयत्न राहील. शिवसेनेने कोणत्याही प्रकारची टीका न करता चर्चेला बसावे, म्हणजे मतभेद मिटतील. राज्यात जागावाटपावर निर्णय घेण्यात येईल. ज्या जागावर काही तिढा असेल त्यांचा निर्णंय केंद्रातून घेतला जाणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

जालना मतदारसंघ भाजपकडेच

शिवसेनेचे अर्जून खोतकर हे जालना मतदारसंघवर दावा करत आहेत. तेव्हा हा मतदारसंघ शिवसेनेला सोडणार का आतापयर्यंत असं घडल नाही, की आमचा असलेला मतदारसंघ सोडला आहे. तेव्हा हा प्रश्‍नच निर्माण होत नाही.

मागितले घरासाठी वीज कनेक्शन अन् हाती पडले चक्क वीजबिल ....
Source:  Lokmanthan
Thursday, 17 January 2019 19:02


वडूज (प्रतिनिधी) - नढवळ ता. खटाव येथील एका नागरिकाने गेल्या सहा महिन्यांपूर्वी घरी वीज मिटर बसवण्यासाठी डिपॉझिट भरले होते. मात्र सहा महिन्यांपासून आज अखेर त्या व्यक्तीला मीटर मिळाला नाही. मात्र चक्क त्याला वीजबिलच देण्यात आले. वीज नसताना ही आपल्याला बिल कसे आले या प्रकाराने सबंधीत व्यक्ती मात्र चांगलाच हतबल झाला आहे. या प्रकारामुळे महावितरणाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की नढवळ (मानेवस्ती)येथील प्रकाश विठ्ठल माने यांनी आपल्या घरात वीज कनेक्शन मिळावे यासाठी गेल्या सहा महिन्यांपूर्वीच डिपॉझिट रक्कम भरली. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून मिटर मिळत नसल्याने त्यांनी कार्यालयात हेलपाटे मारणे सुरू केले.

दरम्यान आज भेटेल, उद्या भेटेल या अपेक्षेत गेले सहा महिने त्यांनी मिटर मिळण्याची वाट पाहिली. मात्र वीज कनेक्शन काही मिळालेच नाही. मात्र, आज अचानक त्यांना घरच्या कनेक्शनचे चक्क 570 रुपये देयक असलेले बिल आले. घरी वीज पुरवठा केला नाही मात्र बिल नेमकं कशाचं आलं या प्रश्‍नाने चक्क हादरूनच गेले.
एवढा पाठपुरावा करून वीज कनेक्शन मिळाले नाही मात्र बिल मिळाले या प्रकाराची चर्चा मात्र आता सर्वत्र सुरू झाली. एकीकडे दुष्काळात तालुक्यातील जनता होरपळत असताना काही कार्यालयाकडून नागरिकांची थट्टा केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली. आता वीज वितरण कंपनी नेमकी याबाबत काय कार्यवाही करणार याकडे लक्ष अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

खटाव तालुका दुष्काळी यादीत समावेश करण्यापासून ते विध्यार्त्यांना एसटी पास मिळण्यापर्यंत सामाजिक कार्यकर्त्याना आंदोलन करावे लागले. मात्र दुष्काळात या विज वितरण कंपनी कडून सामन्यांची थट्टा केली जातेय या मुळे सबंधीत विभागाने भोंगळ कारभार थांबवणे गरजेचे आहे अन्यथा सामांन्यातून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

हज यात्रेवरील जीएसटीच्या दरात कपात
Source:  Lokmanthan
Thursday, 17 January 2019 18:59नवी दिल्ली : हज यात्रेवरील जीएसटीचे दर 18 टक्क्यांवरुन 5 टक्क्यापर्यंत कमी करण्यात आल्यामुळे हज यात्रेकरुंची अंदाजे 113 कोटी रुपयांची बचत होईल, असे केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथील आर. के. पुरम येथे हज विभागाचे नव्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थितांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

यावर्षी 2 हजार 300 हून अधिक मुस्लीम महिला मेहराम शिवाय (पुरुषांशिवाय) हज यात्रेला जाणार आहेत. स्वातंत्र्यांनतर ही प्रथमच वेळ आहे ज्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येत महिला मेहरामशिवाय हज यात्रेला जातील. जवळपास 2 हजार 340 महिलांनी हजयात्रेसाठी आत्तापर्यंत अर्ज केलेला आहे. तर, यावर्षी लॉटरी प्रणाली शिवाय महिलांना हज यात्रेला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वस्तू व सेवा करामध्ये कपात झाल्यामुळे विमान भाड्यातही लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. तसेच पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे हज यात्रेची प्रक्रिया पारदर्शक झाली आहे, असे नक्वी यावेळी बोलताना म्हणाले. मागच्या वर्षी 1 हजार 300 महिला हज यात्रेला गेल्या होत्या.


‘लोकसंवाद’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा शेतकर्‍यांशी संवाद
Source:  Lokmanthan
Thursday, 17 January 2019 18:58


 बुलडाणा,(प्रतिनिधी): शेतात राबून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्राप्त झालेल्या स्वावलंबनाच्या यशोगाथा शेतकर्‍यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या  ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात मांडल्या. सुमारे तीन तास मुख्यमंत्री राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शेतकर्‍यांशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत होते. त्यांच्या अडचणी जाणून घेत होते. काही शेतकर्‍यांनी केलेल्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगत मुख्यमंत्री शेतकर्‍यांना दिलासा देत होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांसोबत संवादाला सुरुवात केली. शेतकरी बांधवांच्या जीवनात कष्टाने पिकविलेल्या तीळ आणि उत्पादित केलेल्या गुळाचा गोडवा कायम रहावा, अशा शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी चर्चेला सुरुवात केली.  यावेळी जिल्ह्यातील शेतकरी बांधव राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्रातील व्हिडीओ कॉन्फरसिंग कक्षामध्ये उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकर्‍यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे तसच शेती परवडेल आणि शेतकरी जगेल.  म्हणून 2022 पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं ध्येय निश्‍चित आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातली 16 हजार गावं जलपरिपूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे 34 लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर पीक उत्पादनामध्ये 45 टक्के वाढ झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळं तर महाराष्ट्राचा कायापालट होऊ घातला आहे. धरणातला गाळ काढून शेतात टाकल्यानं पीक उत्पन्नासाठी कमालीचा फायदा होत आहे. राज्यात 1 लाख 37 हजार शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत  1 लाख 30 हजार सिंचन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. देशातील सर्वात मोठी अशी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवून शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा दिलासा दिला आहे. आतापर्यंत सुमारे 51 लाख खातेदार शेतकर्‍यांसाठी 24 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच 2014-15 पासून आतापर्यंत राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शेतकरी बांधवाना 15 हजार 240 कोटी रुपये वाटप केले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकर्‍यांना दिलासा देत गेल्या चार वर्षात खरीप आणि रब्बी हंगामात दरवर्षी सरासरी 77 लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. योजनेतून सरासरी 55 लाख शेतकर्‍यांना सुमारे 2 हजार 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई विमा कंपन्यांनी दिली आहे. कृषी यांत्रिकीकरणाला मोठ्या प्रमाणावर चालना दिली. त्यासाठी  600 कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान 5 लाख शेतकर्‍यांना देण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक 18 हजार ट्रॅक्टरचे वाटप शेतकर्‍यांना केले आहे. 8 हजार पेक्षा जास्त पॉवर टीलर्स व 45 हजार पेक्षा जास्त यांत्रिक अवजारे वितरित केली आहेत. राज्यातल्या ग्रामीण भागाचं चित्र बदलण्याची क्षमता असलेला एक मोठा प्रकल्प आपण हाती घेतला आहे. जागतिक बँकेनं त्यासाठी 2 हजार 200 कोटी रुपये गुंतवण्याचे मान्य केलं आहे. महाराष्ट्र राज्य कृषी-व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) याद्वारे शेतमाल विक्रीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं, उपलब्ध सुविधांचं  आधुनिकीकरण व बळकटीकरण करणं, शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती करणं आणि शेतमालावर प्रक्रिया करून शेतकर्‍यांना बाजारपेठेशी जोडणं या गोष्टी करणार आहोत. चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना अनुदानासाठी कोणाला पैसे द्यावे लागतात का, असा थेट प्रश्‍न विचारला. त्यावर बहुतांश शेतकर्‍यांनी शेतीच्या कुठल्याही अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. ऑनलाईनमुळे भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे शेतकर्‍यांनी यावेळी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आज सुरुवात झालेल्या महाग्री टेक कार्यक्रमामुळे शेतीत आधुनिकता येईल. त्या माध्यमातून राज्यातला शेतकरी सुजलाम सुफलाम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकर्‍यांच्या बरोबरचा संवाद प्रेरक आणि मार्गदर्शक ठरला. शेतीच्या प्रश्‍नांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

भांडवलवादी व ब्राह्मण्यवादी केंद्र, राज्य सरकारला हटवा
Source:  Lokmanthan
Thursday, 17 January 2019 18:56


सिंदखेड राजा,(प्रतिनिधी): छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नावे घेत केंद्रात तसेच राज्यात भांडवलवादी व ब्राह्मण्यवादी सरकार सत्तेवर आले. जनतेला दिलेली मोठमोठी आश्‍वासने पूर्ण करण्याऐवजी जातीवादाला खतपाणी घालणारे हे सरकार हटवण्याचे आवाहन विद्यापीठ नामांतर लाँगमार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. तालुक्यातील राहेरी येथे 15 जानेवारी रोजी आयोजित नामांतर स्मृती सोहळ्या प्रसंगी प्रा. कवाडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिरिपाचे प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले तर प्रमुख उपस्थितीत युवा नेते जयदीप कवाडे, काँग्रेसचे श्यामभाऊ उमाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, पं. स. सभापती राजेश ठोके, नितीन शिंगणे, माजी सभापती नाथाभाऊ दराडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, प्रवीण गीते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना प्रा. कवाडे म्हणाले की, या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडण्याचे काम या देशातील 130 कोटी लोकांच्या अधिकाराचे हक्काचा कवच निर्माण करण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. ब्राह्मण्यवाद व मनुवाद नष्ट करण्यासाठी आम्हालाही आशीर्वाद द्यावा, कारण बाबासाहेबांचे उपकार मरेपर्यंत आम्ही विसरू शकणार नाही. पण काही नेत्यांनी आमदारकी-खासदारकी साठी जातीयवादी पक्षासोबत राहून आंबेडकर वादी लोकांच्या डोळ्यात धुळफेक केलेली आहे. त्यांना व या जातीयवादी सरकारला हटवण्यासाठी यापुढे आपल्याला संघर्ष करायचा आहे यासाठी आम्हाला समर्थ साथ द्या, असे सांगून त्यांना हटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची शपथ प्रा. कवाडे यांनी यावेळी घेतली व शाहू-फुले-आंबेडकरांचे सरकार आणून देशामध्ये समता-ममता व बंधुत्वाच्या विचारांचे राज्य स्थापन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. जर का यापुढे आपण पुन्हा ही चूक केली तर राज्यघटना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत सरकारवर प्रखर टीका केली. यावेळी अ‍ॅड.नाझेर काझी, जयदीप कवाडे, काँग्रेसचे श्यामभाऊ उमाळकर, पं. स. सभापती राजेश ठोके यांच्यासह मान्यवरांची मार्ग दर्शनपर भाषणे झाली. या कार्यक्रमाचे संचालन युवा कवी रोहित म्हस्के यांनी केले. या नामांतर स्मृती सोहळ्याला असंख्य महिला, पुरुष तसेच राज्यभरातील अनेक भीम सैनिक तसेच मोठा उपस्थित होता.भांडवलवादी व ब्राह्मण्यवादी केंद्र, राज्य सरकारला हटवा विद्यापीठ नामांतर लाँगमार्चचे प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांचे आवाहन सिंदखेड राजा,(प्रतिनिधी): छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नावे घेत केंद्रात तसेच राज्यात भांडवलवादी व ब्राह्मण्यवादी सरकार सत्तेवर आले. जनतेला दिलेली मोठमोठी आश्‍वासने पूर्ण करण्याऐवजी जातीवादाला खतपाणी घालणारे हे सरकार हटवण्याचे आवाहन विद्यापीठ नामांतर लाँगमार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. तालुक्यातील राहेरी येथे 15 जानेवारी रोजी आयोजित नामांतर स्मृती सोहळ्या प्रसंगी प्रा. कवाडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिरिपाचे प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले तर प्रमुख उपस्थितीत युवा नेते जयदीप कवाडे, काँग्रेसचे श्यामभाऊ उमाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, पं. स. सभापती राजेश ठोके, नितीन शिंगणे, माजी सभापती नाथाभाऊ दराडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, प्रवीण गीते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. कवाडे म्हणाले की, या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडण्याचे काम या देशातील 130 कोटी लोकांच्या अधिकाराचे हक्काचा कवच निर्माण करण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. ब्राह्मण्यवाद व मनुवाद नष्ट करण्यासाठी आम्हालाही आशीर्वाद द्यावा, कारण बाबासाहेबांचे उपकार मरेपर्यंत आम्ही विसरू शकणार नाही. पण काही नेत्यांनी आमदारकी-खासदारकी साठी जातीयवादी पक्षासोबत राहून आंबेडकर वादी लोकांच्या डोळ्यात धुळफेक केलेली आहे. त्यांना व या जातीयवादी सरकारला हटवण्यासाठी यापुढे आपल्याला संघर्ष करायचा आहे यासाठी आम्हाला समर्थ साथ द्या, असे सांगून त्यांना हटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची शपथ प्रा. कवाडे यांनी यावेळी घेतली व शाहू-फुले-आंबेडकरांचे सरकार आणून देशामध्ये समता-ममता व बंधुत्वाच्या विचारांचे राज्य स्थापन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. जर का यापुढे आपण पुन्हा ही चूक केली तर राज्यघटना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत सरकारवर प्रखर टीका केली. यावेळी अ‍ॅड.नाझेर काझी, जयदीप कवाडे, काँग्रेसचे श्यामभाऊ उमाळकर, पं. स. सभापती राजेश ठोके यांच्यासह मान्यवरांची मार्ग दर्शनपर भाषणे झाली. या कार्यक्रमाचे संचालन युवा कवी रोहित म्हस्के यांनी केले. या नामांतर स्मृती सोहळ्याला असंख्य महिला, पुरुष तसेच राज्यभरातील अनेक भीम सैनिक तसेच मोठा उपस्थित होता.V

मनसे कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षपदी जाधव
Source:  Lokmanthan
Thursday, 17 January 2019 18:50


पाथर्डी/प्रतिनिधी
परिवहन सेनेचे अध्यक्ष मा. हरी माळी यांच्या आदेशानुसार अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी श्याम जाधव तर विभागीय सचिवपदी शिरीष परदेशी यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी केली. तसे नियुक्तीपत्र अविनाश पालवे यांनी दिले आहे. 

यावेळी पालवे म्हणाले की, संघटना बांधणी व परिवहन कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राज्य अध्यक्ष हरी माळी हे संपूर्ण राज्यभर दौरे करत आहेत. परिवहन कामगारांचे अनेक प्रश्‍न आहेत व ते फक्त मनसेच सोडवू शकते. जाधव व परदेशी म्हणाले की, आजही परिवहन कामगारांचा मनसेवर विश्‍वास असून लवकरच जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या बरोबर संपूर्ण जिल्हा दौरा करून प्रत्येक आगारात संघटना बांधणी करणार आहोत. यावेळी जिल्हाध्यक्ष पालवे यांनी दोघांचेही अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

भगवानगड-बोधेगाव रस्त्याच्या कामासाठी 10 कोटी मंजूर - आ.राजळे
Source:  Lokmanthan
Thursday, 17 January 2019 18:48


चापडगाव/प्रतिनिधी
गेल्या पंधरा वर्षापासुन रखडलेल्या आणि भगवानगड पंचक्रोशीतील गावांची विशेष मागणी असणारा भगवानगड, नागलवाडी गोळेगाव दिवटे ते बोधेगाव अशा सोळा किलोमीटर रस्ताला काल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन दहा कोटी तेहतीस लाख रूपये मंजुर झाले. महाराष्ट्र शासनाच्यावतीने यासंबंधीचा मंजूरी आदेश काढण्यात आला. हा रस्ता आ. मोनिका राजळे यांच्या विशेष प्रयत्नातुन आणि ग्रामविकासमंत्री मा.ना.पंकजा मुंडे यांच्या सहकार्याने मंजुर झाला असल्याने भगवानगड पंचक्रोशीतल्या गावांच्या सरपंचानी आ. राजळे यांचा सत्कार करून विशेष आभार मानले. 


या रस्त्याचे अंतर हे सोळा किलोमीटर असून भगवानगड पायथ्यापासून हा रस्ता नागलवाडी, गोळेगाव, दिवटे ते बोधेगाव राज्य महामार्ग याठिकाणी जोडला जाणार आहे. यामुळे भगवानगडावर जाण्याचे अंतर कमी होऊन भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे. यावेळी आ. राजळे म्हणाल्या की, भगवानगड हे आपल्या सर्वांचे मोठे श्रद्धास्थान आहे. पंकजा मुंडे यांनी विकासनिधी देताना शेवगाव-पाथर्डीला नेहमी झुकते माप दिल्यानं मतदारसंघासाठी आजवर कोट्यावधींचा निधी आणला आहे. यापुढे सुद्धा इतर गावांचे प्रलंबित रस्ताचे प्रश्‍न शासनाकडे पाठपुरावा करून लवकरचं सोडवले जातील. अशी ग्वाही यावेळी आ. राजळे यांनी दिली. यावेळी सरपंच संजय खेडकर, राजेंद्र डमाळे, बापुसाहेब भोसले, सुरेश नेमाने, रंगनाथ बटुळे, केशव आंधळे, भास्कर मासाळकर, भिसे पाटील यांच्यासह भगवानगड पंचक्रोशीतल्या गावच्या उपस्थित सरपंचानी आणि कार्यकर्तेनी आ. राजळे यांचे आभार मानले.

चाकूने मारहाण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Source:  Lokmanthan
Thursday, 17 January 2019 18:45


जामखेड ता./प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर या चाळीस वर्षीय इसमाने चाकूने मारहाण करून बलात्कार केला. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणीवरील आरोपी विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील चुंभळी येथे इयत्ता पाचवीमध्ये शिकत आसलेली अकरा वर्षीय पिडीत मुलगी ही आपल्या आई वडीलांसमवेत राहते. दि. 12 रोजी पिडीत मुलीचे वडील जामखेडला व आई ही विटभट्टीवर कामाला गेले, असता सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेजारी रहाणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर वय 40 वर्षे.रा.चुंबळी. ता जामखेड आरोपीने या अल्पवयीन मुलीला आपल्या घरामध्ये बोलवले व घराचा दरवाजा आतुन बंद करुन मारहाण करुन बलात्कार केला. सदर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर दुसर्‍या दिवशी दि. 13 रोजी रात्री आठ वाजता पुन्हा या मुलीस घरी बोलावून चाकूने मारहाण करून घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारुन टाकेल, अशी धमकी दिली. यानंतर पिडीत मुलीने सदरची घटना झालेली आपल्या आईवडिलांना सांगितली. यानंतर पिडीत मुलीच्या आई वडीलांनी जामखेड पोलिस स्टेशनला धाव घेतली. या अगोदर देखील आरोपीने अनेक वेळा या मुलीची छेडछाड करुन त्रास दिला होता. अशी माहिती पिडीत मुलीच्या आईवडिलांनकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सध्या आरोपी हा फरार असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सा.पो.नि. निलेश कांबळे हे करत आहेत.

फरशी पडून बांधकाम कामगारांचा मृत्यू
Source:  Lokmanthan
Thursday, 17 January 2019 18:45


पुणे : बांधकाम साईटवर फरशीची ने-आण करताना जड फरशी अंगावर पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. येरवडा परिसरात बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ये

रवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोट क्लब रस्त्यावर एका इमारतीचे काम सुरू आहे. याठिकाणी मोठ्या फरश्यांची ने-आण करत असताना यातील काही फरश्या कामगारांच्या अंगावर कोसळल्या. याखाली दोन कामगार दबले गेले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी
Source:  Lokmanthan
Thursday, 17 January 2019 18:30


जळगाव : चाळीसगाव येथील डॉ.उत्तम महाराज यांना डाबून ठेवणू, 25 लाखांची खंडणी मागतील्या प्रकरणी तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज लोहार व उद्योजक धिरज येवले यांना जळगाव न्यायालयाने आज दोषी ठरवले आहे. जळगाव न्यायालयाचे न्या. लाढेकर यांनी हा निकाल दिला असून शिक्षेसाठी 19 जानेवारी पासून पुढील युक्तीवाद होणार असल्याची माहिती डॉ. महाजन यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणातील तिसरे आरोपी चाळीसगावचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विश्‍वासराव निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

जि.प.च्या माजी सदस्याचे अपहरण करुन 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी लोहार व येवले या दोघांना कोर्टाने दोषी ठरविले आहे. डॉ. महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिस अधिक्षक मनोज लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते. ही घटना 30 जून 2009 रोजी चाळीसगाव येथे घडली होती. दरम्यान, लोहार यांची जिल्ह्यातील कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. याप्रकरणी कोर्टाने निकाल दिला. त्यात लोहार व येवले या दोघांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. येत्या 19 जानेवारीला दोन्ही दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 


<< < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > >>